लोकदर्शन 👉मोहन भारती
गडचांदुर: दरवर्षी शहीद अशफाकुल्लाह खान मल्टीपर्पझ सोसायटी बल्लारपुर सामाजिक शैक्षणिक कार्याने छाप सोडणाऱ्या विशेष व्यक्तींना सद्भावना पुरस्कार,तसेच समाज भूषण व विशेष पुरस्काराने सन्मानित करते. शाल श्रीफळ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह च्या स्वरूपात मागील आठ वर्षापासून विविध क्षेत्रातील मान्यवरांना शहीद अशफाकुल्लाह खान मल्टीपर्पझ सोसायटीने सन्मानित केले आहे.
या वर्षी हैद्राबाद येथील सलग 955 दिवसापासून दररोज भोजन दान करणाऱ्या हाजी मोहम्मद हनीफ यांना तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील समाजसेवक, रक्तमित्र सुभाष तेटवार यांना सद्भावना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बल्लारपुर क्षेत्रात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या जय भीम बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व सदस्यांना तसेच 2022 सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने सन्मानित ” पल्याड” चित्रपटातील बालकलाकार रूचीत निनावे यांना या वर्षी विषेश पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील नवउद्योजक इंजि. वासिफ हमीद शेख व याच जिल्ह्यातील गडचांदुर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकविणाऱ्या प्रा.जहीर सैय्यद यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा जहीर सैय्यद सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात मागील 22 वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी व सुट्टीच्या दिवशी ते मुलांकरिता इंग्रजी बेसिक ग्रामरचे मोफत अतिरिक्त वर्ग घेतात त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विवीध क्षेत्रात यश संपादन केले आहे. तसेच ते “जहीर व्हॉईस” (Jahir Voice) या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे व्हिडिओ बनवतात. शैक्षणीक कार्यासोबतच प्रा जहीर सैय्यद हे सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर आहेत.
प्रा जहीर सैय्यद यांच्या शैक्षणिक, सामजिक कार्याची दखल घेऊन शहीद अशफाकुल्लाह मल्टीपर्पझ सोसायटी बल्लारपुर तर्फे त्यांना या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार दिला गेला. यापूर्वी याच वर्षी जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे प्रा. जहीर सैय्यद यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले हे विशेष.
प्रा. जहीर सैय्यद यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदुरचे अध्यक्ष डॉ. आ. श. अडबाले, उपाध्यक्ष तू. ता. पुंजेकर सचिव ना.श. बोबडे, सहसचिव विनायक उरकुडे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मराज काळे, पर्यवेक्षक गाडगे आणी सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, विद्यालयातील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी प्रा. जहीर सैय्यद यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.