लोकदर्शन मुंबई(प्रतिनिधी-👉गुरुनाथ तिरपणकर)
मुंबई — दर्याचा राजा दिवाळी अंक एक आदर्श अंक आहे. या अंकात मधु मंगेश कर्णिक , डॉ. विजया वाड उषा मेहता, रत्नकर मतकरी या मान्यवरांच्या साहित्या बरोबर नवोदितांचे असे शंभर लेखक कवींचे दिवाळी साहित्य संमेलन भरून वाचकांना साहित्य फराळ पुरविले आहे या दिवाळी अंकाचे मी मनापासून अभिनंदन करून प्रकाशन झाले असे जाहीर करतो असे उद्गार सुप्रसिद्ध कवी गीतकार, गझलकार सदानंद डबीर यांनी दर्याचा राजा दिवाळी अंक २०२२ विशेषांकाचे प्रकाशन करताना काढले प्रारंभी दर्याचा राजाचे संपादक श्री पंढरीनाथ तामोरे यांनी शाल श्रीफळ आणि पुष्प करंडक देऊन सदानंद डबीर यांचा शानदार सत्कार केला आणि पंधरा वर्षाच्या दर्याचा राजाचे यशस्वी वाटचालीचा आढावा सादर केला सदर प्रकाशन सोहळ्यात महाराष्ट्र राज्य माजी मत्स्य आयुक्त विनोद नाईक, कवी वसंत तांडेल, समाजसेवक जयवंत गावडे, सहसंपादक प्रवीण वैद्य, मांगेला समाज माहीमगाव शाखा अध्यक्ष अविनाश तांडेल, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघाचे “कार्यवाह अँड. सुनील शिर्के यांनी दर्याचा राजाच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सदानंद डबीर यांच्या पत्नी सौ मृण्मयी सदानंद डबीर, समाजसेवक प्रकाश धनु फोटोग्राफर रामदास तांडेल उपस्थित होते कार्यकारी संपादक जनार्दन पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. सदानंद डबीर यांनी गायलेल्या गीत गझल कार्यक्रमाने प्रकाशन समारंभास एक वेगळीच उंची लाभली टाळांच्या कडकडात कार्यक्रमाची सांगता झाली.