ब्रिटनचे पीएम ऋषी सुनक यांचे सारथी प्रज्वल पांडे कोण आहेत? वय फक्त १९ वर्षे

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या राजकीय चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. आता भारतीय वंशाचे ऋषी सुनकपंतप्रधान झाले आहेत. याअगोदर झालेल्या निवडणुकीत त्यांचा थोड्याच मतांनी पराभव झाला होता. ऋषी सुनक यांच्या या विजयाच्या पाठिमागे एका भारतीय तरुणाचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. हा तरुण बिहार असून त्याचे नाव प्रज्वल पांडे असं आहे.

बिहारचा हा तरुण प्रज्वल फक्त १९ वर्षांचा आहे. तो १६ वर्षांचा असताना कंझर्व्हेटिव्ह पक्षाशी संबंधित आहे. तो ऋषी सुनक यांच्या ‘कोअर कॅम्पेन कमिटी’चे स्टार प्रचारक होता. सुनकसाठी, सोशल मीडियापासून इतर प्लॅटफॉर्मवर, प्रज्वलने प्रसिद्धीची जबाबदारी घेतली. सुनक आणि त्यांच्यात कौटुंबिक संबंध आहेत. प्रज्वल बिहारमधील त्याच्या मूळ गावी जामापूर येथे येत राहतो.

प्रज्वल ब्रिटनच्या प्रतिष्ठित किंग एडवर्ड सिक्स ग्रामर स्कूल, चेम्सफोर्डमध्ये शिकत आहे. वयाच्या १६ व्या वर्षी प्रज्वलने ब्रिटनच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केला. त्याने २०१९ मध्ये यूके युथ पार्लमेंटसाठीही विक्रमी विजय मिळवला. त्यानंतर २०२१ मध्ये झालेल्या हार्वर्ड इंटरनॅशनल इकॉनॉमिक निबंध स्पर्धेतही तो विजेता ठरला होता. ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन सरकारच्या पतनादरम्यान तो सुनक यांच्या गटात सामील झाला.

ऑगस्ट २०२२ मध्ये जेव्हा सुनक यांनी ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू केला, तेव्हा प्रज्वलला कोअर टीमचा भाग बनवण्यात आले. निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रज्वलने प्रचार व्यवस्थापनात खूप मेहनत घेतली, पण सुनक पंतप्रधान होऊ शकले नाहीत. दोन महिन्यांत अशी परिस्थिती निर्माण झाली की लीज ट्रस्ट यांना राजीनामा द्यावा लागला. पुन्हा एकदा संधी चालून आली आणि सुनक पंतप्रधान झाले.

प्रज्वलचे मूळ गाव जामापूर हे बिहारच्या सिवान जिल्ह्यात येते. त्यांचे आजोबा वगीश दत्त पांडे सुमारे ५० वर्षांपूर्वी येथून सिंद्री येथे गेले होते, जे आता झारखंडमध्ये येते. प्रज्वलचा जन्म बंगलोरमध्ये झाला. प्रज्वलच्या जन्मानंतर काही दिवसांनी ते ब्रिटनला गेले होते. प्रज्वलचे वडील राजेश पांडे हे देखील यूकेमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर आई मनीषा पांडे यूकेमध्ये शिक्षिका आहेत.

प्रज्वलच्या कुटुंबातील बाकीचे सदस्य सिंद्री येथे राहतात. प्रज्वल जेव्हा ऋषी सुनक यांच्यासाठी काम करत होता. तेव्हा संपूर्ण कुटुंबाला आणि गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटला. त्यांनी पुढे राजकारणात राहून भविष्यात ब्रिटनचे पंतप्रधान व्हावे, अशी गावातील लोकांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here