उरण जांभूळपाडा खून खटल्यातील आरोपीला अवघ्या अडीच महिन्यात जामीन मंजूर

 

लोकदर्शन उरण 👉(विठ्ठल ममताबादे

उरण दि 18 ऑक्टोंबर उरण तालुक्यातील जांभूळपाडा गावामध्ये दिनांक 24/ 7 /2022 रोजी पत्नीची हत्या केल्या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 198/2022 प्रमाणे भा.द.वि. कलम 302, 201, 34 अन्वये फिर्यादीने दाखल केला होता. तिन्ही आरोपींना उरण पोलिसांनी त्वरीत दिनांक 28 जुलै 2022 रोजी अटक केली होती. उरण येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता उरण न्यायालयाने दिनांक.01/08/2022 रोजी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश केले होते. त्यानंतर वरील आरोपीं पैकी आरोपी नंबर 2 नवनाथ राम कातकरी यास जामीन मिळण्याकरता उरणचे नामांकित वकील एडव्होकेट प्राची निग्रेश पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल यांच्या न्यायालयात जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला असता सदरच्या अर्जावर उरण पोलीस ठाण्याचे तपासी अंमलदार आणि जिल्हा सरकारी वकील पनवेल यांनी जोरदार हरकत घेतली असता आरोपीतर्फे वकील म्हणून एडव्होकेट प्राची निग्रेश पाटील यांनी न्यायाची बाजू व्यवस्थित कायदेशिर मांडून युक्तिवाद केला आणि जिल्हा व सत्र न्यायालय पनवेल यांच्या न्यायालयाने दिनांक.14/10/2022 रोजी सदर खून खटल्यातील आरोपीस जामीन मंजूर केला. त्यामुळे उरण तालुक्यातील समस्त आदिवासी समाज व आरोपींच्या नातेवाईकांकडून एडव्होकेट प्राची निग्रेश पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *