लोकदर्शन नवी मुंबई -👉 (गोठीवली-प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)
श्रीरामपूर -सुप्रसिध्द चित्रपट जण गीतकार बाबासाहेब सौदागर यांची मुंबई येथील अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाच्या संचालक पदी निवड झाली आहे.कवी बाबासाहेब सौदागर हे पंचविस वर्षांपासून मराठी चित्रपट क्षेत्रात गीतकार पटकथा संवाद लेखक म्हणून कार्यरत आहेत.यशवंत भालकर यांच्या ‘सत्ताधीश’ चित्रपटात त्यांनी पहीला अभंग लिहीला.हे गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले होते.या चित्रपटात भजनी मंडळ प्रमुखांच्या भुमिके पासून त्यांनी अभिनयासाठी सुरुवात केली.या नंतर त्यांनी गीतलेखन क्षेत्रात पंचविस वर्षांत अनेक चित्रपटात गीत लेखना सोबत कर पटकथा संवाद लेखन आणि अभिनय केला.अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.’अंतर्दाह ‘ चित्रपटातील गीतलेखना साठी भारत सरकारच्या सह्याद्री वाहिनी मुंबई दुरदर्शन चार सह्याद्री सिने अवाॅर्ड पुरस्कार मिळाला आहे.’शंभरपेक्षा जास्त चित्रपट आणि सत्तावीस मालिकां साठी त्यांनी गीत लेखन केलेले आहे.’भंडारभुल’ चित्ररंग सांजगंध पिवळण आणि पायपोळ आत्मचरित्र ही त्यांची पुस्तके लोकप्रिय ठरलेली आहेत.त्यांनी लिहीलेले ‘आमचा नेता लयी पावरफुलं,तसेच ‘सिंहाच्या जबड्यात घालुनी हात ‘ही गाणी अनेक लावण्या लोकप्रिय आहेत.’राजमाता जिजाऊ’मी सिंधुताई सपकाळ’लग्नाची वरात लंडनच्या घरात . मध्यमवर्ग . झुंजार.शिवा .तुझा दुरावा.घुंगराच्या नादात हे चित्रपट गीतलेखन आणि भुमिका असलेले लोकप्रिय ठरलेले आहेत.कवी सौदागर यांचे हे योगदान लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माते महामंडळाचे अध्यक्ष देवेंद्र मोरे आणि कार्यवाह संजय दिक्षीत यांनी बाबासाहेब सौदागर यांची संचालक पदी बिनविरोध निवड केली आहे.