लोकदर्शन 👉 मोहन भारती
*गडचांदूर:-*
शरदराव पवार कला वाणिज्य महाविद्यालय, गडचांदुर येथे इंग्रजी विभागाच्या वतीने *”करिअर इन कंपनी सेक्रेटरी*” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे मुख्य वक्ते ICSI नागपूर विभागाचे CS, आल्हाद महाबळ हे होते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करताना ते याप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी आय ICSI चे सीनियर ऑफिसर श्री सुधाकर आयसलवारू, दीपक भोसले , दिनेश बोरीकर, महाविद्यालयाच्या IQAC चे समन्वयक डॉ. संजय गोरे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार सिंह हे होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, आधुनिक युगात जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झालेले आहे. या दृष्टीने सर्व क्षेत्रातील नूतनीकरणामुळे अनेक बदल झाले आहेत. सार्वजनिक कंपन्यांच्या तुलनेत खाजगी कंपन्याचा बाजारात चांगलाच प्रभाव दिसून येतो आहे.अश्या औद्योगिक-संबंधित क्षेत्रातील कामांची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी प्रशिक्षित आणि उच्च शिक्षित मानवी संसाधनांना खूप महत्त्व असणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी यापुढे आपला कल खासगी क्षेत्राकडे वाढविण्याची गरज आहे असे ते याप्रसंगी म्हणाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार सिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा वेळोवेळी आवर्जून दिल्या पाहिजे तसेच आपल्या फॅकल्टी च्या अभ्यासा सोबत इतरही अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे असे विशद केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सुनिल बिडवाईक यांनी केले याप्रसंगी त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका विशद केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापक मंगेश करंबे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्वच विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांचे विशेष सहकार्य लाभले.