लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिलेले क्रांतिकारक व समाजसुधारक या विषयावर विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन 8 ऑक्टोबर ला करण्यात आले,
या स्पर्धेत प्रथम क्रमांक साक्षी डोहे हिने पटकाविला, द्वितीय क्रमांक काजल सोनी हिने तर तृतीय क्रमांक दीपक केवट याने पटकाविला,
स्पर्धेचे परीक्षण प्रा नंदा भोयर यांनी केले, स्पर्धेचे संचालन प्रा आरजू आगलावे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा सुरेखा ठाकरे यांनी केले,
या स्पर्धेचे आयोजन प्राचार्या सौ स्मिता चिताडे व उपप्राचार्य विजय आकनूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा संगीता गिरी व इतरांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.