लोकदर्शन 👉नितेश केराम
शिवसेना पक्ष आपलाच असा दावा करून पक्षावर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाद सर्वोच न्यायालयात सुरु असतांना न्यायालयाच्या आदेशाने निवडूनक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते
आयोगाच्या आदेशानुसार काल शिंदे गटाने आपले कागदपत्त्रे कालच आयोगाला सादर केले होते. तर मुदत वाढवून मागून अखेर आज ठाकरे गटाला आपले कागदापत्र आयोगाला सादर केले
दोनी गटांचे उत्तर दाखल झाल्यानंतर निवडूनक आयोगाने निर्णय जाहीर केला असून पुढील आदेशापर्यंत दोनी गटांना शिवसेनेचे धनुष्यबाण हें निवडूनक चिन्ह वापरता येणार नसून आयोगाने तात्पुरत्या स्वरूपात धनुष्यबाण हें चिन्ह गोठवले आहे त्याच बरोबर निवडूनक आयोगाने पक्षाचे शिवसेना हें नाव सुद्धा गोठवले असून हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का समजल्या जातो