लोकदर्शन👉 शिवाजी सेलोकर
विदर्भातील काशी म्हणून ख्याती असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा या देवस्थानाला धार्मिकदृष्ट्या अधिक महत्व प्राप्त व्हावे म्हणून रुद्राक्ष व बेलाचे वृक्षारोपण वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 7 ऑक्टोबरला करण्यात आले. अमोल आईंचवार मित्रपरिवार व आर्य वैश्य स्नेह मंडळाकडून यावेळी मार्कंडा देव येथे रुद्राक्ष व बेल या वृक्षांची दिंडी काढण्यात आली.
श्री रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात
प्रमुख पाहुणे म्हणून मार्कडादेवचे सरपंच उज्ज्वला गायकवाड यांचे सह आर्य वैश्य स्नेह मंडळ चंद्रपूरचे विश्वस्त राजेश सुरावार, कवडू आईंचवार,जयंत बोनगीरवार,अविनाश उत्तरवार,बंडूभाऊ चिंतावार,दिलीप नेरलवार,महेश काल्लूरवार,गिरीधर उपगंलावार,अमित कसंगोट्टूवार यांची तर अतिथी म्हणून शैलेंद्रसिंह बैस, प्राचार्य डॉ.हिराजी बनपुरकर,न.प. च्या महीला बाल कल्याण सभापती प्रेमा आईंचवार, जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा गडचिरोली, अविनाश तालापल्लीवार राज्य उपाध्यक्ष जि. प.विभाग, सोमा गुडघे, दिलीप तायडे, दिलीप कुनघाडकर, धर्मशाळेचे अध्यक्ष गंगाधर कोंडुकवार, सचिव अशोक तिवारी, केशव आंबटवार, गोपाल महाराज रणदिवे, महेश काबरा, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप चलाख, नंदू रणदिवे, प्रशांत समर्थ विनोद पेशट्टीवार, बबन वडेट्टीवार, वनविभागाचे कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
श्री रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेत चाकलपेठ येथील गुरुदेव सेवा मंडळाचा भजन कार्यक्रमासह वृक्ष दिंडी गावातील प्रमुख मार्गाने नेण्यात आली त्यानंतर धर्मशाळेच्या जागेवर.रुद्राक्ष व बेल या झाडाचे मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
या प्रसंगी सरपंच गायकवाड म्हणाल्या, मार्कडा येथे उत्तर वहिनी वैनगंगा नदी काठावर मार्कंडेश्र्वर देवस्थान आहे.त्यामुळे महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. या स्थळाला फार मोठे धार्मिक अनन्यसाधारण महत्त्व असल्याने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार यांनी या स्थळी रुद्राक्ष व बेल या झाडाचे वृक्ष लावल्यास भविष्यात या झाडाला धार्मिक महत्व येईल ही संकल्पना मांडली होती.ती आज पूर्ण होत आहे.या वृक्षांना जोपासणे ही प्रत्येकाची जवाबदारी आहे.असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे संचालन संतोष सुरावार यांनी तर अमोल आईंचवार यांनी आभार मानले. सर्व अतिथींना रामप्रसाद जयस्वाल मराठा धर्मशाळेच्या पदाधिकारी यांचे हस्ते विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले