कुणाल पाटील यांची सामाजिक बांधिलकी. कराडी समाजाच्या गोमेश्वर मंदिरासाठी 25000 ची आर्थिक मदत.

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि. 8 (विठ्ठल ममताबादे)उरण तालुक्यातील पागोटे गावातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल अरुण पाटील हे विविध सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतात. वर्षभरात सामाजिक बांधिलकी जपत ते विविध उपक्रम साजरा करतात. पागोटे गावात कराड़ी समाजाच्या गोमेश्वर मंदिरासाठी सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांनी 25000 रुपये देणगी दिली आहे. यावेळी कराडी समाज पागोटेचे अध्यक्ष नरेश भोईर, उपाध्यक्ष माणिक पाटील, सेक्रेटरी सुजीत पाटील,खजिनदार नरेश पाटील, महेश पाटील, धीरज पाटील, विनय पाटील, वसंत भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या कुणाल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत कराडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी कुणाल पाटील यांचे आभार मानले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *