वंशाचा दिवा मुलगाच…. मुलगी का नको*

 

लोकदर्शन 👉 डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड जिल्हा-ठाणे
मो.९६१९५३६४४१

घटनेने स्त्री पुरुष समानता हा अधिकार दिलेला आहे. पण खरंच सर्वत्र स्त्री पुरुष समानता दिसते का? स्त्रीला पुरुषाच्या म्हणण्याप्रमाणेच वागावे लागते.जर तिने तसे केले नाही तर तिचे जगणे असह्य होते. तिला घराबाहेर काढले जाते.आपला मान टिकून ठेवण्यासाठी तिला शांत राहणे अगत्याचे आहे.
काहीजण सहजच म्हणतात, “ही पुरुषप्रधान संस्कृती आहे ” म्हणजेच स्त्री पुरुष समानता पूर्णपणे सर्वांना मान्य नाही. हे त्याचेच द्योतक आहे. मुलाच्या जन्माचा सोहळा होतो. पण, मुलीच्या जन्माचा सोहळा करणारे काही हातावर मोजण्याइतकेच पालक असतील. मुलगा व्हावा म्हणून अगदी पाच- पाच, सहा -सहा मुलींच्या रांगा लागतात. शेवटी ही प्रतीक्षा का असते? तर मुलगा व्हावा. वंशाला दिवा मिळावा. मुलाची आशा एका स्त्रीला किती वेदना देते. आई म्हणून ती या सर्व वेदनांना सहन करत असते.समाजात आपला मान मोठा रहावा.आपले कुटुंब सुखी संपन्न व्हावे म्हणून एक स्त्री अगदी गप्प राहून मुलाच्या आशेने परत परत गरोदरपणाला सामोरे जात असते.
मुलगा हवा.जो आपला आधार होणार आहे.जो मुलगा शिकून एक चांगली नोकरी करणार आहे. मुलगा झाला तर तो आपला सांभाळ करेल.आपले नाव पुढे चालू राहील.आपल्या म्हातारपणी भक्कम आधार होईल.ही एक साधारण अशी सुप्त आशा प्रत्येक व्यक्तिच्या ठाई वसलेली असते.काही अपवाद असतील ही. बरेचदा स्त्री भ्रूणहत्या घडवून आणली जाते.एका मुलाची आशा मुलीच्या जन्माला अडसर बनते. मुलाला जन्म देण्याची इच्छा मणी बाळगणाऱ्या व्यक्तिंना आज ही कळले नाही का? एक मुलगीच मुलाला जन्म देते. जर ही मुलगी नसली तर मुलाचा जन्म कसा होईल?
मुलगाच हवा या आशेला आज काही प्रमाणात तरी तडा गेला आहे.आजची पिढी सुशिक्षित आहे. या भेदाला थांबवणे आवश्यक आहे. याचा विचार करून काहींनी अगदी आदर्श पाऊल ठेवले आहे. केवळ एक मुलगी झाल्यावर त्यांनी वंश वाढविणे थांबवले आहे.या मुलीलाच ते आपल्या कुटुंबाचा आधार मानतात ‘मुलगी शिकली प्रगती झाली’ या उक्तीप्रमाणे मुलीला शिकवून शहाणं करून, चांगली नोकरी देऊन स्वावलंबी जीवन जगण्याची संधी पुरवतात. या मुलीही आज सासर आणि माहेर या दोन्ही ठिकाणी आपले कर्तव्य बजावत आहेत.त्या केवळ कुटुंबाचे प्रतिनिधित्व करत नाहीत तर, समाज व राष्ट्र यांचा ही गौरव आहेत.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. तर राष्ट्रपती होण्याचा बहुमान द्रोपदी मुर्मू यांचा आहे.
नक्कीच आपण म्हणू शकतो,
*मुलगा मुलगी वंशाचा दिवा
सर्वांनी तो तेवत ठेवा.*

डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड जिल्हा-ठाणे
मो.९६१९५३६४४१

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *