लोकदर्शन👉मोहन भारती
जिवती – भारतात अनेक वर्षांपासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजीव व पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. वन्यजीवांनी मानवी वस्तीत प्रवेश करण्यामागची कारणे, अनेक आहेत.
पृथ्वीवर प्रचंड जैवविविधता आहे. परंतु जंगलतोड, वाढते शहरीकरण, पशुपक्ष्यांच्या अधिवासांवर आक्रमण होऊ नये व पर्यावरण संवर्धन ही महत्वपूर्ण गरज आहे , वन्य जीव सप्ताह निमित्त वि कॅन फाउंडेशन व वन विभाग जिवती
अंबुजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक आश्रम शाळा नगराळा येथे वन्यजीव सप्ताह निमित्य शालेय विद्यार्थी यांचा जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती वनपरिक्षेत्र अधिकारी जिवती ,श्री. लंगडे यांनी वन्यजीव बदल माहिती दिली,
व परिसरात आढणाऱ्या वन्य प्राणी , व दुर्मिळ प्रजाती ,पर्यावरण संवर्धन, या विषयावर प्रितेष मत्ते यांनी मार्गदर्शन केले,अंबुजा फाउंडेशनचे विधाते यांनी जल, जंगल आणि जमीन महत्व पटवून सांगितले यानंतर बालाजी बिंगेवाड वनरक्षक यांनी लुप्त होत असलेल्या सारस पक्ष्या विषयी व चित्या विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शालेय विद्यार्थ्यांची सकाळी गावात प्रभात फेरी काढून गावात वन्यजीव संवर्धन करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच प्रोजेक्टर द्वारे वण्यजीव डॉक्युमेंटरी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महत्व पटवून देण्यात आले,
या कार्यक्रमाला, वि कॅन फौंउडेशनचे राकेश गोरे ,श्रीनिवास पवार, प्रितेष मते ,दीपक पाटील, वनधीकारी बिंगेवाढ शाळेचे मुख्याध्यापक चिकूलवार चव्हाण, वनाधिकारी कारेकर , अलाम ,मोकिंद राठोड शाळेचे विद्यार्थी व इतर वन कर्मचारी उपस्थित होते.