लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरोना महामारीच्या कारणास्तव रेल्वे मंत्रालय, भारत सरकार द्वारे देशातील 20 कोटी सामान्य जेष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासाची सवलत बंद करून जोराचा झटका दिलेला आहे.रेल्वेत जेष्ठ नागरिकांना कोरोनापूर्वी पुरूषांना 40 टक्के तर महिलांना 70 टक्के सवलत मिळायची,रेल्वे द्वारा महिलांकरिता वयोमर्यादा 58 वर्षे, तर पुरुषांकरिता 60 वर्ष अशी निर्धारित आलेली होती. मात्र रेल्वे मंत्रालयाने जेष्ठ नागरिकांच्या सवलती बंद करून 20 करोड जेष्ठ नागरिकांवर घोर अन्याय केला आहे, असा आरोप लेखक, सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्ते प्रा विजय राठी यांनी केला आहे.
रेल्वे ने मानवतेचे पालन करावे असे आवाहन प्रा राठी यांनी केले आहे. रेल्वे नफा कमविणारी इंडस्ट्री नसून सर्वसामान्य नागरिकांकरीता सेवेचे साधन आहे. देशातील सामान्य व गरीब जनता तसेच जेष्ठ नागरिकांसाठी प्रवासाचे सुखद व सुरक्षित साधन आहे.भारतीय रेल्वे 135 करोड देशवासियांच्या सुविधेचे साधन आहेत, लोकप्रतिनिधी ला रेल्वे ने विविध सुविधा पुरविल्या आहेत, त्यावर करोडो रुपये खर्च करीत आहेत, या सवलती बंद करून मोदी सरकारने बंद करून जेष्ठ नागरिकांना फ्री रेल्वे सवलत पूर्ववत सुरु करावी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडे जिल्हाधिकारी मार्फत प्रा विजय राठी यांनी केली आहे.