लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ५ ऑक्टोंबर पुनाडे आदिवासी वाडीवरील सुरेश अंबाजी कातकरी (वय २२ वर्षे) या तरुणांला रात्री १-०४ च्या सुमारास सर्पदंश झाल्याची घटना मंगळवारी (दि ४) घडली.चिरनेर गावातील सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी प्रसंग सावध पणाने सुरेश कातकरी या तरुणाला तातडीने नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करुन घेतले. डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न करुन आदिवासी तरुणांचे प्राण वाचले आहे.
उरण तालुक्यातील फ्रेंड्स आँफ नेचर ( फाँन ) या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष तथा सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की उरण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पुनाडे आदिवासी वाडीवरील सुरेश अंबाजी कातकरी या २२ वर्षाच्या तरुणाला मंगळवार दि४ रोजी रात्री १-०४ च्यासुमारास सर्पदंश झाल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात आले.सदर घटनेची माहिती सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी आपले सहकारी सर्पमित्र गोरख यास देऊन तातडीने सर्पदंश झालेल्या तरुणाला प्राथमिक उपचार म्हणून कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णालयात नेण्यात आले.परंतु रुग्णालयातील डॉक्टर हे निद्रिस्त अवस्थेत असल्याचे व रुग्णवाहिकेवर चालक नसल्याचे भयानक चित्र पहावयास मिळताच, सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी प्रसंग सावध पणाने खाजगी गाडीतून नवीमुंबई रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला.
एकंदरीत सुरेश कातकरी या तरुणाला नाग सापा पेक्षा १० पट विष जहाल असलेला मण्यार जातीचा साप चावल्याचे समजताच सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी नवीमुंबई येथील रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून सर्पदंश झालेल्या तरुणाला उपचारासाठी घेऊन येतो असे सांगितले, परंतु वेळ होत असल्याने सुरेश कातकरी यांच्या अंगात जहाल विष पसरण्यास सुरुवात झाल्याने त्यांनी नवीमुंबई येथील रुग्णालयाच्या आवारात रक्ताची उलटी केली. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले.सकाळी ठिक ६ वाजता सुरेश कातकरी हा तरुण सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना सांगितले.जयवंत ठाकूर यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.आणि डॉक्टरांच्या सहकार्याने आदिवासी तरुणांचे प्राण वाचले आहे.एकंदरीत फ्रेंड्स आँफ नेचर ( फाँन) च्या सर्पमित्रांनी नवीमुंबई रुग्णालयातील डॉक्टरांच्या सहकार्याने सुरेश कातकरी या तरुणा प्रमाणे ४० सर्पदंश झालेल्या नागरिकांना जीवनदान दिले असल्याचा समाधान शेवटी सर्पमित्र जयवंत ठाकूर यांनी व्यक्त केला.ततपुर्वी सुरेश कातकरी या तरुणाचे प्राण तर वाचविले पण सुरेश यांच्या पुढील उपचारासाठी थोडी मदतीचा ही हात ही पुढे केला आहे असे सुरेश चे वडील अंबाजी कातकरी यांनी सांगितले .