लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
दसरा दिवाळी च्या तोंडावर 42 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना व 70 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना जुलै 2022 पासून 4 टक्के महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांच्या निमित्ताने 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी व 6.5 लाख निवृत्ती वेतन धारकांना थकबाकी सह 4 टक्के महागाई भत्ता जुलै पासून जाहीर करून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्याचे अभ्यासक ,सामाजिक कार्यकर्ते प्रा विजय राठी यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
शिक्षक संघटना व कर्मचारी संघटना यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी तयार राहावे असे आवाहन प्रा विजय राठी यांनी केले आहेत.