लोकदर्शन👉 राहुल खरात
मिरज
दि. ३ ऑक्टोबर २०२२
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दि. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी मिरज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, मिरज तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचे लाभार्थ्यांना हफ्ते वेळोवेळी मिळत नाही. लाभार्थ्यांना महिनोमहिने पंचायत समिती मध्ये हप्त्यासाठी हेलपाटे मारून देखील त्यांची संबंधित अधिकाऱ्या कडून दखल घेतली जात नाही. शासना कडून पैसे जमा झाले नाही, नेटवर्क नाही, तुमच्या बँक खाते चुकले अशी कारणे सांगून अधिकारी वेळ मारून नेतात. बिचारा लाभार्थी हतबल होऊन तो परत जातो.मिरज तालुक्यातील जे पेंडिंग रमाई घरकुल योजनेचे जे प्रस्ताव मिरज तालुक्यातील सर्व गावातील घरकुलचे प्रस्ताव द्यायचे शिल्लक आहेत त्याची पूर्तता करावी आणि पंचायत समितीकडे त्वरित मागवून घ्यावेत.
तीच परिस्थिती मिरज तालुक्यातील रोजगार हमी मस्टरची आहे. सदरच मस्टरचे पैसे देखील वेळेवर जमा केले जात नाहीत. काही वेळेला तर मस्टर मजुराचे पैसे इतर दुसऱ्याच मजुराच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेचे आढळून आले आहे असे पुरावेनीशी मस्टर सापडलं आहे. अश्या प्रकारे गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय थांबवावे व रमाई घरकुल आवास योजनेचे पैसे त्वरित सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी कडून मिरज पंचायत समिती समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मिरज तालुकाध्यक्ष संजय कांबळे, उपाध्यक्ष विशाल धेंडे, महासचिव अनिल पवार, संघटक प्रमोद मल्लाडे, हौसाबाई कांबळे, वसंत भोसले, अनिल अंकलखोपे आदी उपस्थित होते.