लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ओबीसी प्रगत कोणत्याही पुढारलेल्या जातीचा समावेश करू नका या आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग पुणेचे अध्यक्ष न्यायमूर्ती चंदुलाल मेश्राम यांना चंद्रपूर भेटीदरम्यान शिवब्रिगेड संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष सतीश मालेकर जिल्हा सचिव प्रलय मशाखेत्री यांनी दिले या निवेदनात म्हटले आहे की मंडल कमिशन 1931 च्या जनगणनेनुसार ओबीसी प्रवगाची लोकसंख्या 52 टक्के ग्राह्य धरून ओबीसी प्रवर्गातील सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व न देता केवळ 27टक्के प्रतिनिधित्व दिले ओबीसी समाजाला दिलेले प्रतिनिधित्व सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने पुरेशा प्रमाणात नाही त्यामुळे त्यानंतर कोणतेही पुढारीला जातीचा समावेश करू नये अशी मागणी शिवबिगेड संघटनेतर्फे करण्यात आली त्यासोबत सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांना 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी शाहू महाराज शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी तसेच जातीय जनगणनेची मागणी निवेदनातून करण्यात आली.