लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे सकाळी ठिक ११ वाजता अभिष्ठचिंतन सोहळा आणि काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर, जिल्हा काँग्रेसचे महासचिव विनोद दत्तात्रेय, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, काँग्रेसण ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, सेवादलचे अध्यक्ष दिनकर कर्णेवार, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सविता टेकाम, अल्पसंख्यक काँग्रेसचे अध्यक्ष सय्यद सकावत अली, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदाताई जेणेकर, अभिजीत धोटे मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, धोटे घराण्याचा इतिहास संघर्षाचा आहे. वडलांचा राजकीय वारसा त्यांना सहजपणे मिळाला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत अरूणभाऊंनी राजुरा नगर परिषदेत विजयश्री खेचून मागील ३५ वर्षापासून विकासकामांचे वलय निर्माण केले आहे. आमदार सुभाषभाऊ धोटे यांनाही फार उशीरा संधी मिळाली परंतु त्यातही त्यांनी संधीचे सोने करीत दोनदा क्षेत्राचे आमदार म्हणून जनसेवा करीत आहेत. राजुरा शहर व मतदार क्षेत्रात दिसणारा विकास धोटे बंधूंच्या संघर्षशील कर्तुत्ववाची साक्ष देणारा आहे. कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता सर्व जनतेने, कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करावे, येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवा असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार सुभाष धोटे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या संपुर्ण सामाजिक, राजकीय कारकीर्दीचा प्रवास उलगडून दाखविले. जुन्या आठवणीं, विकासकामांचा उल्लेख करीत त्यांना शुभ आशीर्वाद दिले. संचालन एजाज अहमद यांनी तर आभार प्रदर्शन यांनी केले. कार्यक्रमाला काँग्रेसच्या सर्व विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.