लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 29 सप्टेंबर उरण तालुक्यातील कळंबूसरे येथे इंद्रायणी एकविरा देवीचे पांडवकालीन स्वयंभू स्थान आहे. प्राचीन काळी पाच पांडव वनवास करत असताना या इंद्रायणी कळंबुसरे डोंगरावर वास्तव्यास होते. तसेच कार्ल्याची एकविरा देवी पण या ठिकाणी वास्तव्यास होती.एका दिवसात माझे देऊळ या ठिकाणी बांधा मी येथे वास्तव्यास राहीन असा आदेश एकविरा देवीने पाच पांडवांना दिला. पण एका दिवसात या ठिकाणी देऊळ बांधता आले नाही. देवीने देऊळ व इतर परिसर उध्वस्त केले. देवळाचे काही अवशेष या ठिकाणी पाहायला मिळतात. या नंतर देवी कार्ला येथे स्थायिक झाली. देवीचे आज ही येथे वास्तव्य आहे.तसेच देवी नवसाला पावणारी, मनातील ईच्छा पूर्ण करणारी म्हणून प्रचलित आहे. येथे चैत्र उत्सव व नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तसेच पावसाळ्यात या ठिकाणी निसर्ग रम्य वातावरण आपणास पाहायला मिळते .वर्षा सहलीसाठी हे ठिकाण खुप चांगले आहे. इंद्रायणी एकविरा देवी मंदिर कळंबुसरे या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी असे हे निसर्गरम्य ठिकाण आहे. इंद्रायणी एकविरा माता ट्रस्ट कळंबुसरे उरण यांच्या मार्फत व ग्रामस्थांमार्फत येथे विविध सण उत्सव साजरे केले जातात.