लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना -इच्छाशक्ती व प्रयत्नाची पराकाष्टा करण्याची तयारी असेल तर कुठलेही यश मिळविणे अशक्य नाही याची प्रचिती देत
कोरपना येथील विपुल शंकर साळवे यांनी एम टेक च्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली.
विपुल हा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थानचा विद्यार्थी
असून त्यांनी एम टेक च्या धातू व पदार्थ अभियांत्रिकी मधील प्रोसेस मेटलर्जी इंजिनिअरिंग प्रोग्राम या विद्याशाखेतून सर्वाधिक ९.२७
सीजीपीए प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला अलीकडे नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान येथे आयोजित २० व्यां दीक्षांत समारंभात उपस्थित मान्यवराच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याने आपल्या यशाचे श्रेय आई – वडील, व्ही एन आय टी चे एम टेकचे प्राध्यापक यांना दिले आहे.
त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.