लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*गडचांदुर* – कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी नगरपरिषद म्हणून नावाजलेली गडचंदुर नगर परिषद मध्ये नुकतेच एप्रिल २०२२ ला १ कोटी रुपयाचे घनकचरा व्यवस्थापनाचे काम देण्यात आले.त्या अंदाजपत्रकात संपूर्ण शहरातील घरोघरी रोज ओला व सुखा कचरा गोळा करणे,शहरातील संपूर्ण सरकारी संदासची साफसफाई करणे,कचऱ्याचे विलगिकरण करणे,नमूद आहे त्याकरिता ९ गाड्या व ४० ड्रायव्हर व सफाईकाम गार नमूद आहे व त्याच प्रमाणे नगर परिषद नाममात्र बिल कपात करून बिल दिल्या जात आहे.
शहरातील साफसफाई होत नाही,सरकारी संडास साफसफाई करण्यास पूर्ण वेळ व रोज मजूर राहत नाही,रोज घरोघरी घंटा गाडी संपूर्ण घरी जात नाही,
ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जात नाही, कचऱ्याचे विलंगिकरण केल्या जात नाही असे असताना मात्र ठेकेदाराला बिल देण्याचे काम तत्कालीन मुख्याधिकारी व विभाग प्रमुख स्वप्नील पिदुरकर करीत आहे.आणि शहरातील
स्वच्छताकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःचे स्वार्थ साधण्याकडे विशेष लक्ष घालतात.
अश्या अनेक नागरिका कडून तसेच नगरसेवक कडून आरोग्य सभापती कडे तक्रारी प्राप्त झाल्या वरून आज अचानक थेट नगर परिषदेला सकाळी ५.३० ला भेट दिली व नगरसेवक अरविंद डोहे आणि सौ एकरे नगरसेविका यांच्या नेहमी तक्रारी असल्याने त्यांना सुध्दा बोलावण्यात आले.व त्यांचे समक्ष रोज सकाळी शहरात घरोघरी गाड्या जाणाऱ्या किती आहे ? व मजूर किती आहे ? याबाबतची प्रत्यक्ष पाहणी केली असता चालू कंडीशन मध्ये केवळ ४ गाड्या आढळल्या तर ३ गाड्या बंद अवस्थेत होत्या व २ गाड्या चंद्रपूर येथे ग्यारेजला दोन दिवसापासून आहे. ४० मजूर पैकी केवळ १६ मजूर हजर होते.तर बाकी मजूर गैरहजर होते.विशेष म्हणजे कोणत्याही मजुराला सेफ्टी चे कोणतेही साहित्य नव्हते.हे बघताच सभापती महोदया ने आचार्य व्यक्त केले.
व घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचे स्पष्ट लक्ष्यात येत असून या ठेक्याची उच्च स्तरीय चौकशी करून आरोग्य विभाग प्रमुख श्री स्वप्नील पिदुरकर यांना निलंबित करण्याची मागणी
मा जिल्हाधिकारी यांचे कडे करणार असल्याचे मत व्यक्त केले.आता या प्रकरणात काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे