लोकदर्शन 👉 प्रा. गजानान राऊत
चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व विदर्भ महाविद्यालय जिवती यांच्या वतीने शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये मार्च/ फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत इयत्ता दहावी व बारावीत तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यांना त्यांच्या सन्मानार्थ सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व एक पुस्तक भेट स्वरूपात देऊन त्यांनी मिळविलेला यशाकरिता अभिनंदन करून भविष्यातील पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाकरिता प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे *अध्यक्ष श्री मधुकरजी चापले* सर मुख्याध्यापक बालाजी हायस्कूल जिवती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून विदर्भ महाविद्यालय जिवती प्राचार्य डॉ. एस. एच.शाक्य मॅडम उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देशमुख, प्रा. वासाडे, प्रा. तेलंग, प्रा. लांडगे, प्रा. पानघाटे प्रामुख्याने उपस्थित होते. एखाद्या अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांसमोर सत्कार करणे म्हणजे एक प्रकारची शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना नवचेतना, प्रेरणा, जिद्द निर्माण करण्याच काम करत असते. असे प्रतिपादन चापले सरांनी आपल्या वक्तव्यात म्हटले.त्यांच्या यशाला पाहून आपणही मार्गक्रमित करावा हा दृढसंकल्प त्यांच्या मनी यावा ही एक मोठी संकल्पना माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेऊन दरवर्षी इयत्ता दहावी व बारावी मध्ये तालुक्यातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून, बहुमान वाढविल्या जात आहे. तर या प्रकारचे पुरस्कार जिवती सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांना आत्मबल वाढविण्याचे कार्य करतात. स्पर्धेच्या युगात टिकण्याची शक्ती प्रदान करतात असे अध्यक्ष स्थानावरून बोलतांना प्राचार्य डॉ शाक्य यांनी म्हटले. जिवती तालुक्यातून इयत्ता दहावीत कु. आयेशा जब्बारखान पठाण बालाजी हायस्कूल जिवती हीने 93 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कु. मोनिका राठोड विदर्भ महाविद्यालय जिवती हीने इयत्ता बारावी विज्ञान शाखेतून 80 टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम तर निशा चव्हाण विदर्भ महाविद्यालय जिवती हिने कला शाखेतून 74 टक्के गुण घेऊन तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविलेला आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राऊत यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. वासाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले…