,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर,,👉(प्रा.अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी (अल्ट्राटेक) च्या लॉजीस्टिक विभाग,ग्रामीण रुग्णालय व कॉमन सर्विस सेंटरच्या वतीने आरोग्य विषयक जनजागृती,एच आय व्ही एड्स तपासणी, ईश्रम कार्ड, जण आरोग्य योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती सुरक्षा विमा,व केंद्र सरकारच्या विविध योजनेची जनजागृती करण्यासाठी ट्रक यार्ड परिसरात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी अल्ट्राटेक सिमेंट चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ धर्मेंद्र मिश्रा,डॉ सुनीत जैन,निरंजन मंगरुळकर,नंदकिशोर पोडे, मोहम्मद नजमुद्दीन,लॉजीस्टिक प्रमुख अभिषेक तिवारी, ग्रामीण रुग्णालय गडचांदूर चे आसमा पठाण, शिल्पा साळवे, गोपाल पोरालवर,सचिन रुयारकर,कॉमन सर्विस सेंटर चे केंद्र चालक उद्धव पुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी परिसरातील सर्व ट्रक वाहन चालकांची रक्त तपासणी करण्यात आली. विविध आजार व त्यासंबंधी घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन उद्धव पुरी यांनी केले.एच आय वी सारख्या आजारांची लक्षणे आढळल्यास त्याची भीती न बाळगता त्वरित रक्त तपासणी करून उपचार केल्यास या दुर्धर आजारावर मात करता येते अशीही माहिती या वेळी उपस्थितांना देण्यात आली. प्रधानमंत्री ई श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी करिता वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता राजेश खंडाळ,अतुल कदम,रवी सुरणर यांनी सहकार्य केले.
,