लोकदर्शन गडचांदूर 👉प्रा अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना – कुरई – वेळाबाई फाटा राज्य महामार्गची (क्रमांक ३७५) अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्याच बरोबर रस्त्याच्या कडाही खचल्या असल्याने पादचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे रस्त्यासह कडांची ही दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होते आहे.
कोरपना शहरातील बसस्थानक पासून तुकडोजीनगर पर्यंत ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पोलीस स्टेशन, विश्रामगृह , प्रभाकरराव मामुलकर महाविद्यालय, स्टेला मारीस कॉन्व्हेन्ट , हनुमान जिनिंग , स्कॉलस सर्च अकॅडमी, इदगाह, तालुका क्रीडा संकुल, जगन्नाथ बाबा मंदिर आदी महत्वपूर्ण स्थाने असल्याने या मार्गावर पायदळ प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. सकाळी व संध्याकाळी वॉकिंग करण्यासाठी नागरिक याच मार्गाला पसंती देतात. परंतु सद्यस्थितीत यवतमाळ जिल्हा हद्द वगळता कोरपना ते कोडशी खु येथील पैनगंगा नदीवरील पुलापर्यंत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. तसेच रस्त्याच्या कडा ही खचल्या गेल्या आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणे येणे जिकरीचे ठरते आहे. सदर मार्ग राज्य महामार्ग असल्याने आम् रहदारी सोबत अवजड वाहतूक
या रस्त्यावरून रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात होते. रात्रीच्या वेळेस तर येथून प्रवास करणे अत्यंत जोखमीचे ठरते आहे. या अनुषंगाने लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती व रुंदीकरण करावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अंधारातून करावा लागतो प्रवास
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना – वणी राज्य महामार्ग वरील कोरपना बस स्थानक ते तुकडोजीनगर हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर रस्ता दुभाजक तयार करून मधोमध पथदिवे लावण्यात यावे. जेणेकरून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना सोयीचे होईल. तसेच अंधारामुळे निर्माण होणारे भीतीदायक वातावरण दूर होईल.
,