पत्रकार उत्कर्ष समितीचा जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा…!

 

लोकदर्शन मुंबई – 👉राहुल खरात

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र मुंबई शाखा व श्री. दत्तगुरु प्रतिष्ठान संस्थेने संयुक्त्त रित्या हिन्दी भाषिक दिना निमित्त दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृह, कामाठीपुरा येथे नुकताच साहित्यीक, वृत्तपत्रलेखक कवी मुक्त्त पत्रकार, डॉक्टर, वकील इत्यादिनसह बहुजन समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.अध्यक्ष स्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष. डॉ. अशोक म्हात्रे हे होते. प्रास्ताविक भाषण श्री. दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. राजेंद्र लकेश्री यांनी करून संस्थेच्या कार्याची माहिती सादर केली. तर, उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा परिचय कवी शशिकांत सावंत यांनी करून दिला यावेळी जेष्ठ मुक्त्त पत्रकार श्री. राजेंद्र लकेश्री. याची पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई शाखेच्या अध्यक्षपदी निवड केलेल्याचे पत्र डॉ. अशोक म्हात्रे यांनी दिले याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद, महापालिका सभागृह माजी नेते बबन गवस, ज्ञानेश्वर कोळी, शैलेश ठाकूर, कवी विलास खानोलकर इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या प्रसंगी जेष्ठ वृत्तपत्रलेखक सर्वश्री, सुरेंद्र तेलंग,अनंत दाभोळकर,भाई नार्वेकर, शशिकांत सावंत, सुभाष बाघवणकर, विलास देवळेकर, पत्रकार फिरोज अल्ली शेख, जेष्ठ नागरिक वसंत हरयाण, रघुनाथ शेरे, शंकरराव गड्डम, आनंद मुसळे,टेडू बाबू , तिरूपती आसम शेट्टी, सुधीर गावडे, सत्यनारायण आसम शेट्टी, बाभय्या, शेख अब्दूल करीम, बाबी तळेकर, अशोक परब, मारूती कूंचाल, हेमंत अनुमाला, रमेश कोटा, गजानन महाडीक, राजेश्वर जोगू, लहू नर,शुभाष साठे, डॉ.दशरध तांडूर, इत्यादिना शॉल, श्रीफळ व प्रमाण पत्र देवून बहुजन समाजातील मान्यवरांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार श्री. संतोष कोलगे यांनी मानले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *