लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विद्यार्थ्यांकरिता गीत गायन स्पर्धेचे आयोजन 20 सप्टेंबर ला करण्यात आले,
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा, प्रफुल्ल माहुरे,प्रा नंदाताई भोयर होत्या,
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग घेतला,या गितगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रज्ञा जीवने, द्वितीय क्रमांक कल्याणी बोरकर तृतीय क्रमांक नूतन उपरे,चौथा क्रमांक मनीषा इबतकर ,पाचवा क्रमांक सानिया पठाण यांनी पटकावला, स्पर्धेचे परीक्षण प्रा आरजू आगलावे व प्रा आशीष देरकर यांनी केले,प्रास्तविक उपप्राचार्य विजय आकनूरवार ,संचालन कार्यक्रम अधिकारी प्रा प्रदीप परसुटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा सुधीर थिपे यांनी केले,
याप्रसंगी प्रा सचिन भैसारे, प्रा नितीन वाढई,तथा विद्यार्थी उपस्थित होते.