लोकदर्शन उरण 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 18 सप्टेंबर कोकण मराठी साहित्य परिषद(कोमसाप )व मधुबन कट्टा या साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्थेतर्फे महिन्याच्या प्रत्येक 17 तारखेला उरण शहरातील विमला गार्डन येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येते.कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप)शाखा उरण व मधुबन कट्टा तर्फे विमला तलाव उरण शहर येथे कविसंमेलन व जीवनगौरव पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 17/9/2022 रोजी सायंकाळी 5:00 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी जीवन गौरव सन्मान पुरस्कार रविंद्र चिंतामण सूर्यवंशी,शंकर राव,अरविंद घरत तर गुरूवर्य शिक्षक सन्मान आदर्श शिक्षक संजय होळकर,रंजना केणी तसेच समाज प्रबोधना बद्दल विशेष सन्मान अजय शिवकर यांचा करण्यात आला.अभंग रचना, सन्मान शिक्षकांचा, कथा आणि व्यथा जेष्ठांच्या या विषयावर कवितांचे वाचन गायन झाले.यावेळी रायगड भूषण जेष्ठ साहित्यिक प्रा.एल बी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी साहित्य क्षेत्रातील जेष्ठ कवी लेखक, साहित्यिक उपस्थित होते.श्रीधर पाटील,मोरेश्वर म्हात्रे,शोभा जोशी,संग्राम तोगरे, सि.बी म्हात्रे,भालचंद्र म्हात्रे,अरूण म्हात्रे,वसंत राऊत, कोमसाप उरण अध्यक्ष मछिंद्र म्हात्रे, मधुबन कट्टा उरण अध्यक्ष भ. पो. म्हात्रे, कोषाध्यक्ष कोमसाप उरण रामचंद्र म्हात्रे,जिल्हा प्रतिनिधी संजय होळकर, जिल्हा प्रतिनिधी चेतन पाटील,दर्शना माळी,श्रीम.समता ठाकूर,संजीव पाटील,अनंत पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.