लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 16 सप्टेंबरला जागतिक ओझोन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून ओझोन दिनाचे महत्त्व सोदाहरण समजावून सांगितले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करावा व वृक्षारोपण करण्याचा मानस अंगिकारावा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील विज्ञान शिक्षक सुरेश पाटील यांनी केले त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून ओझोन वायूचा स्तर दिवसेंदिवस कसा विरळ होत असून त्याचा सजीव सृष्टीवरu होणारा परिणाम कसा भयावह राहील याची विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली त्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असून जास्तीत जास्त पर्यावरण प्रेमी विद्यार्थी तयार व्हावे व वृक्षांना जगवण्याचा संकल्प करावा असे विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सेवा जेष्ठशिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी केले कार्यक्रमाला विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय गाडगे यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.