अखेर गडचांदूरच्या उपनराध्यक्षावर गुन्हा दाखल* *विलास मांडवकर आत्महत्या प्रकरण* *आरोपीची अटकपूर्व जमीनसाठी धरपळ* *आरोपीवर 420 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी*

 

लोकदर्शन👉 प्रतिनिधि

*गडचांदूर*
औधोगीक नगरी गडचांदूरात 11 सप्टें रोजी जमिनीच्या व्यवहारातून घडलेल्या विलास मांडवकर आत्महत्या प्रकरणात दोषी असणारे गडचांदूर नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष शरद जोगी व प्रशांत पंचभाई यांच्यावर गडचांदूर पोलिसांनी 14 सप्टें रात्रौ उशिरा भारतीय दंड संहिता 1860 कलम 306, व 34 अन्वये गुन्हा दाखल (आत्महत्येस प्रवृत्त करणे यासाठी) केला आहे .

जमीनचे व्यवहारातून माणसाच्या जीवावर उठल्याची घटना दि.11 सप्टें ला गडचांदूर शहरात घडली . येथील वार्ड न .3 मधील राहवाशी असणारे विलास वासुदेव मांडवकर यांनी 11 सप्टेंबर च्या पहाटे विषप्राशन केले .त्याला उपचारासाठी चंद्रपूरला नेतानाच रस्त्यातच त्याच्या मृत्यू झाला .मात्र त्याच्या जवळ सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये जमीन व्यवहारातून त्याला शरद जोगी ,प्रशांत पाचभाई यांचे कडून मिळालेल्या धमकी तुन दहशतीत आत्महत्या करीत असल्याचे विलास ने उल्लेख केल्याने शहरात खळबळ उडाली .
मृतक विलास यांनी मनोज शर्मा नामक इसमासोबत 60 लाख रुपयात 5 एकर त्याच्या आजीचे नावे असणाऱ्या शेतजमिनीचा सौदा केला होता .ती जमीन हायवेरोड मध्ये असल्याने त्याचा मोबदला आम्हाला मिळावा असे म्हटले होते .त्याचे सोबत दिनेश सोनी ,मनोज शर्मा ,बाळू घायवनकर ,गजानन गाणंफाले , पंकज गंपावार ,यांनी आमचे आई – वडिलांकडून 5 एकरच्या ठिकाणी 11.5 एकराची रजिस्ट्री करून घेतली .प्रशांत पाचभाई यांनी मला कुठंही जाऊ दिले नाही . शरद जोगी आणी प्रशांत पाचभाई यांनी पैशाचे आमिष दाखवून आमच्या कडून काम करून घेत होता .असे सुसाईड नोट मध्ये उल्लेख आहे .

मृतक विलासच्या सुसाईड नोटच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपीवर कारवाही करून अटक करावी यासाठी घटनेच्या दिवशी मुतकाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणेच्या गेटवर मृत शरीर ठेऊन आंदोलन केले होते .मात्र विलासचा मृत्यू चंद्रपूरला झाल्याने मर्ग झालेले कागदपत्र आल्यावर गुन्हा दाखल करू म्हणून ठाणेदाराने नातेवाईकांना समजाविले होते .काल गुन्हा दाखल होताच आरोपी शहरातून पसार झाले असून ,अटकपूर्व जामिनासाठी धरपळ सुरु आहे .

जमिनीच्या व्यवहारात विलासची फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या शरद जोगी व प्रशांत पाचभाई व इतरांवर कायदा कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी विलासचे नातेवाईक करीत आहे .

*राजकीय गोटात खळबळ*

मृतक विलास मांडवकर याचे सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणारे शरद जोगी हे गडचांदूर नगरपरिषदचे विद्यमान उपनगराध्यक्ष असल्यामुळे जोगी यांना अटक होईल का ?झाली तर त्याच्या राजकीय भवितव्य काय आशा चर्चा राजकीय गोटात चर्चिल्या जात आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here