कुणाल वांगलवार मराठी अस्मिता पुरस्कार ने सन्मानित .
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
पालकमंत्री सूधीरभाऊ मुनगंटीवार व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व फिल्म अभिनेता अतुल परचुरे यांनी केले सन्मानित.
लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर —–
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
चंद्रपूर येथे नवराष्ट्र मराठी अस्मिता पुरस्कार 2022 हा सत्कार सोहळा राधाकृष्ण सभागृह येथे नुकताच संपन्न झाला.यामध्ये एलेक्सटी म्युच्युअल बेनिफिट निधी लिमी.अर्थात ए एम बी निधी लिमिटेड चे गडचांदूर येथील शाखेचे व्यवस्थापकीय संचालक कुणाल प्रभाकर वांगलवार यांना मराठी अस्मिता पुरस्काराने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार , जिल्हाधिकारी अजय गुल्हाने फिल्म अभिनेता अतुल परचुरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी,गोडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे,नवभारतचे महाव्यवस्थापक शेखर चांदले,शेत्रिय व्यवस्थापक राहुल कविस्कर, प्रामु ख्याने हजर होते. यावेळी 39 व्यक्ती ज्यांनी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नाव लोकिक मिळवले आहे अश्या राजकीय,सामाजिक, सांसकृतिक क्षेत्रात आपले नाव लोकिक केलेल्या मान्यवरांचा नवराष्ट्र मराठी अस्मिता अवॉर्ड 2022 मे सन्मान पत्र,मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे संचालन प्रशांत विग्नेश्वर यांनी केले तर आभार प्रशांत चाहांदे यांनी मानले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.