लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
ब्रिटिश राजवटी विरुद्ध सशस्त्र संघर्ष लढा उभारणारे आद्यक्रांतीविर उमाजी राजे नाईक यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उपप्राचार्य विजय आकनूरवार होते,तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक एच बी मस्की ,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, कला शाखेचे प्रमुख प्रा प्रफुल्ल माहुरे होते.
सर्वप्रथम आद्यक्रांतीविर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,याप्रसंगी अमृता इखारे यांनी उमाजी नाईक यांच्या जीवनचरित्र वर प्रकाश टाकला. संचालन प्रा नितीन वाढई यांनी केले.तर आभार प्रदर्शन शीतल बोधे यांनी केले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालय व एम सी व्ही सी विभागात शिक्षक दिन निमित्ताने घेण्यात आलेल्या स्वयंशासन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले त्यात कु समीक्षा उरकुडे(प्राचार्य) कु,तन्वी झाडे (उपप्राचार्य)साजन सोनी(पर्यवेक्षक) यश वरफडे व अभिजित कुबडे (शिपाई) आसिफ अन्सारी (शारीरिक शिक्षक,) प्रिन्स शाह (एम सी व्ही सी प्रमुख)व शिक्षकांच्या भूमिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले, स्पर्धेचे परीक्षण प्रा चेतना कामडी,प्रा विवेक पाल,प्रा बाळू उमरे,प्रा सुरेखा झाडे,प्रा नितीन वाढई,प्रा रोशन मेश्राम, प्रा उमेश राजूरकर यांनी केले, या कार्यक्रमाचे आयोजन प्रा प्रदीप परसुटकर, प्रा नंदा भोयर,प्रा प्रगती आगे ,प्रा, आरजू आगलावे,प्रा माधुरी पेटकर यांनी केले,या बक्षीस वितरण समारंभ चे संचालन प्रा सुधीर थिपे व प्रा अशोक डोईफोडे यांनी केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.