महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक दिन साजरा ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, स्वयंशासन व गणवेश वितरण कार्यक्रम चे आयोजन

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विज्ञान महाविद्यालय,विद्या मंदिर,स्कॉलर अकॅडमी गडचांदूर च्या वतीने शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड.विठ्ठलराव धोटे होते,प्रमुख अतिथी म्हणून सौ,प्रतिभाताई धोटे, संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,जेष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, संचालक विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे,श्रीमती उज्वलताई धोटे,प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे,प्रभारी प्राचार्य रामकृष्ण पटले,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की होते.
सर्वप्रथम माजी राष्ट्रपती डॉ राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ऍड विठ्ठलराव धोटे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.तसेच
शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,भेटवस्तू, देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षक दिन निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन कार्यक्रम आयोजित केला होता ,शिक्षकांच्या उत्कृष्ट भूमिका करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके अतिथी च्या हस्ते वितरित करण्यात आली, गरीब विद्यार्थ्यांना गणवेष वितरण अतिथी च्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी सौ,प्रतिभाताई धोटे,प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी मार्गदर्शन केले,
प्रास्ताविक एच बी मस्की यांनी केले संचालन उपप्राचार्य विजय आकनूरवार व प्रशांत धाबेकर यांनी केले.
याप्रसंगी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *