लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– समग्र शिक्षा, पंचायत समिती राजुरा अंतर्गत घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य विज्ञान मेळावा २०२२ महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा येथे नुकतीच घेण्यात आली. यात एकूण १८ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये इन्फंट कान्व्हेंट ची विद्यार्थ्यांनी क्रांती विद्यासागर लिहितकर वर्ग ६ वी अ हिने १०० पैकी ९२ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. या प्रसंगी स्पर्धेचे परिक्षक, पंचायत समिती चे अधिकारी, कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले.
तर तिच्या या यशाबद्दल तिचा शाळा व संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी मार्गदर्शक शिक्षिका सरोज गाडगे, विद्या चौधरी, प्रतिभा बोबडे यासह शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी क्रांती चे अभिनंदन केले आहे.