सिंधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुनिता सोयाम यांची बिनविरोध निवड.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा (ता.प्र) :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्याक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गावातील अवैध दारू बंदी महीला समिती च्या सदस्या मधुन सुनीताबाई अर्जुन सोयाम यांची तमुस अध्यक्ष म्हणून उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी नाव सुचवले आणि राजकुमार दामेलवार यांनी अनुमोदन दिले. शेवटी सुनिताबाई सोयाम यांची तमुस अध्यक्षपदी सर्व ग्रामसभा सदस्यांनी बिनविरोध निवड केली. नवनिर्वाचित तमुस अध्यक्ष सुनिताबाई सोयाम यांचे आणि समीतीचे संरपच शोभाताई रायपल्ले, उपसरपंच रामभाऊ ढुमणे, सिंधी बिटाचे पोलिस अंमलदार पवार साहेब, राजकुमार दामेलवार, मंगेश रायपल्ले, रविंद्र चंद्रागडे, मंगेश घुबडे, राहुल धानोरकर, कुणाल वैरागडे, प्रविन बोबडे, महादेव वैरागडे, मारोती आत्राम यासह सर्व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here