लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
कोरोना निर्बंध उठल्यावर तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी गडचांदूर शहरात पोळा उत्सव समितीच्या वतीने बैल पोळा व तान्हा पोळा गांधी चौकात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शुक्रवारी शेतकऱ्यांनी आपापल्या बैलजोडी सजावट करून आणल्या होत्या, उत्कृष्ट बैलजोडीस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शनिवारी बालगोपालानी आपापले लाकडी नंदी सजावट करून आकर्षक विविध वेशभूषा मध्ये आणले होते,याप्रसंगी बालगोपालानी विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करून प्रेक्षकांना आकर्षित केले,उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजयी बालगोपालाना उपस्थित अतिथी च्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रथम क्रमांक चा पुरस्कार दिव्यांश एकरे, द्वितीय पुरस्कार युग झाडे,तृतीय रियान कोल्हे ,चतुर्थ सारिका नवलकर, व 10 बालकांना प्रोत्साहनपर पुरस्काराने गौरविण्यात आले, पोळा उत्सव समितीचे संयोजक रमेश काकडे यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, सचिन भोयर, प्रा शरद बेलोरकर,उध्दव पुरी,पवन राजूरकर, रऊफ खान,शरद जोगी,मनोज भोजेकर, रोहन काकडे,रोहित शिंगाडे,मयूर एकरे,महेंद्र ताकसांडे,सतिश उपलेंचवार,रामसेवक मोरे,कल्पना निमजे,मीनाक्षी एकरे,शिवाजी सेलोकर,बंटी गुरनुले, पंकज इटनकर, मेगराज एकरे,तथा इतर उपस्थित होते, पोळा उत्सव बघण्यासाठी बालगोपाल,पुरुष, महिला, युवक, युवती,मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.