विद्यानगरी येथे तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा

 

लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,
कोरोना निर्बंध उठल्यावर तब्बल दोन वर्षानंतर यावर्षी गडचांदूर शहरात पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यानगरी दुर्गा उत्सव समिती च्या वतीने सुद्धा तान्हा पोळा चे आयोजन विद्यानगरी येथे करण्यात आले होते
शनिवारी बालगोपालानी आपापले लाकडी नंदी सजावट करून आकर्षक विविध वेशभूषा मध्ये आणले होते,याप्रसंगी बालगोपालानी विविध प्रकारचे आकर्षक देखावे सादर करून प्रेक्षकांना आकर्षित केले,उत्कृष्ट सजावट करणाऱ्या विजयी बालगोपालाना उपस्थित अतिथी च्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.प्रथम क्रमांक चा पुरस्कार सुजल राठोड, द्वितीय पुरस्कार श्रीराज ताजने,तृतीय पुरस्कार अनन्या वरारकर प्रोत्साहनपर पुरस्कार सार्थक अतकारे ,अनमोल उईके,आदित्य पिदूरकर,अभिनय चटप यांनी पटकाविला.याप्रसंगी विद्यानगरी दुर्गा उत्सव समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगरू,माजी नगरसेवक निलेश ताजने,प्रल्हादराव आडकीने, रमेश भालेराव,विलास कोतपल्लीवार, प्रा अशोक डोईफोडे, सुरेश आत्राम,किशोर निर,देविदास भोयर,बापूराव वानखेडे, नरेश शेंडे,बंडू बुचे,देवराव टोंगे,विनायक राठोड,धर्मा पोहाने, गजू आडकीने,राजेश पवार,चव्हाण तथा इतर पुरुष व महिला उपस्थित होत्या,बालगोपाल आपआपल्या आई,वडील, भाऊ,बहिणीला सोबतीला घेऊन आले होते,
स्पर्धेचे परीक्षण सौ शीतल लेक्कलवार,व रंजना मोरे यांनी केले,
संचालन व आभार प्रदर्शन चंद्रकांत शिंगरू यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *