लोकदर्शन 👉 सिद्धार्थ गोसावी
चंद्रपुर:-
पडोली चौक येथे वाहतूक नियंत्रण सिग्नल, स्ट्रीट लाईट आणि सौंदयकरण साठी 3 मई 2022 ला श्री मनोज वसंत ठेंगणे यानी आमरण उपोषणाला शुरुवात केली होती.उपोषणाच्या चौथ्या दिवशी मा. श्री. ना. सुधीर भाऊ मुनगंटीवार यानी उपोषण मंडप स्तळी भेट देऊन सर्व मागण्या पूर्ण करून द्यायचे आश्वासन दिले आणि शरबत पाजून श्री मनोज वसंत ठेंगणे यांचे उपोषण सोडविले.शेवटी श्री मनोज वसंत ठेंगणे यांच्या उपोषणाला यश आले आणि आज दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी मा.ना.श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य, मस्त्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने परिवहन आयुक्त रस्ते सुरक्षा उपाययोजना अंतर्गत 5 कोटी 21 लक्ष निधी मंजूर करून जनतेचा सुरक्षे शी निगडीत असलेला मोठा प्रश्न मार्गी लाविला.त्या बद्दल आज दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी पडोली चौक येथे सुधीर भाऊ आगे बढो अश्या घोषणा देत उत्साह साजरा करण्यात आला…या प्रसंगी ज्यांनी उपोषण केले अशे श्री मनोज वसंत ठेंगणे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक.. ज्यांचेसहकार्य लाभले अशे श्री रामपाल भैया यादव भाजप ज्येष्ठ नेते, श्री नामदेव भाऊ डाहुले जिल्हा महामंत्री, अनील भाऊ डोंगरे प्रदेश सचिव, श्री रुद्रप्रताप तिवारी उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा अध्यक्ष, श्री अजय चारलेकर भाजपा तालुका उपाध्यक्ष, श्री विक्की लाडसे सरपंच पडोली ग्रामपंचायत,श्री.अशोक पटेल ता.उपाध्यक्ष सोशल मिडीया युवा मोर्चा,श्री महेश येनुरकर,श्री सुदर्शन निसाद,श्री डाॅ.झाडे,श्री निशीकांत पिसे सदस्य पडोली ग्रामपंचायत सौ. दुर्गा बावणे, सौ. कल्पना घुमे, सौ. चंद्रकला असुटकर इत्यादी सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर पदाधीकारींची उपस्थीती होती