अवैध प्लास्टिक वाहतूक पकडून लाखों रुपयांची हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्याना निलंबित करा.

लोकदर्शन गडचांदूर,👉 ( दीपक वरभे) :-

गडचांदूर न.प कर्मचारी कपिल नलेवार आणि प्रमोद वाघमारे यांच्या विरोधात दीपक वर्भे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

 

गडचांदूर नगरपरिषद ही नेहमीच वादात गुंतलेली असताना आता या नगरपरिषद चे कर्मचारी खुलेआम प्रतिबंधित असलेल्या प्लास्टिक च्या (पत्रावळी, द्रोण, गिलास, कटोऱ्या व अन्य) भरलेले बंद पिकअप वाहन पकडल्या नंतर त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करत त्यातून लाखों रुपयांची हेराफेरी करण्याचे प्रकरण सामाजिक कार्यकर्ते तथा कोरपना तालुका प्रेस क्लब चे सदस्य दीपक वर्भे यांनी उघडकीस आणले आहे.

या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यात प्लॉस्टीक बंदी असून विविध ठिकाणी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु आहे. मात्र कोरपना तालुक्यातील नगर परिषद गडचांदूर हद्दीत सदर प्लॉस्टीक बंदीचा पुरता बोजवारा उडाल्याचे स्पष्ट दिसून येते. दरम्यान, काल दि. २४ ऑगष्ट २०२२ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वर्धा येथील सुमित ब्रिजकिशोर नाजोदिया यांचे पिकअप वाहन उल्लेखित प्लॉस्टिकच्या वस्तु भरुण गडचांदूर येथील मे. झुल्लूरवार कॅम्पलेक्समध्ये असलेल्या मे. भवाणी जनरल स्टोअर्स गडचांदूर येथे दाखल झाले. या वाहनात पुर्ण प्लॉस्टीकच्या वस्तु होत्या. त्या वस्तू सदर दुकाणात उतरवणे सुरु असल्याची कुणकुण नगर परिषदच्या काही कर्मचाऱ्यांना लागली. तेव्हा कपिल नलेवार आणि प्रमोद वाघमारे हे दोघेही सदर दुकाणात जाऊन त्यांनी कथीत धाडीची थातुरमातूर कार्यवाही केली.

दरम्यान, बघ्याची गर्दी वाढल्याने कपिल नलेवार,प्रमोद वाघमारे यांनी थोडासा प्लॉस्टिक माल वाहनात ठेवून ते वाहन गडचांदूर नगरपरिषदेत नेले. तेव्हा गाडी मालकाशी बोलून तडजोड करून नगदी दोन लाख रुपयावर अखेर तडजोड झाल्याची माहिती आहे. लगेच पावती क्रमांक ३३३८४ नुसार फक्त पन्नास हजार दाखवून उर्वरित दिड लाखाची त्यांनी अफरातफर केल्याचा गंभीर आरोप आहे.

सदर सर्व प्रकरण श्री. श्रीकांत झुल्लुरवार आणि भवाणी जनरल स्टोअर्सच्या सिसिटिव्हीत रेकॉर्डींग झाले आहे. पोलीसांकडून हे सारे फुटेज तपासल्यास संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊ शकतो. तेव्हा या गंभीर प्ररकणाची तातडीने दखल घेऊन कपिल नलेवार आणि प्रमोद वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी दीपक वर्भे, राजू चौधरी, अशोक बोधे, प्रवीण काकडे, सुनील अरकिलवार, करणंसिंग भुराने इत्यादींनी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषद द्वारे केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *