लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
तब्बल दोन वर्षानंतर कोरोना चे निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहेत, शांतता व सुव्यवस्था च्या दृष्टीने पोलीस ठाण्यात शांतता समिती ची सभा रविवारी रात्री झाली.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या, पोलीस प्रशासन आणि न्यायालयीन सूचना चे पालन करणे प्रत्येक मंडळाला बंधनकारक राहील, गणेशोत्सव मंडळ ला परवानगी सुलभ रीतीने मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे असे सांगितले, धार्मिक भावना दुखावल्या जाईल असे कोणतेही कृत्य करू नये असे आवाहन करण्यात आले. पोलीस प्रशासन च्या वतीने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळाला पुरस्काराने गौरविण्यात येणार आहेत, स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव साजरा केला जातो आहे तेव्हा समाजप्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे,अश्या अनेक सूचना देण्यात आल्या,
सभेला नगर परिषदेचे अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे नेते,गणेश मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
,