लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
श्रीकृष्ण मंदिर कन्हाळगाव येथे जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दहीहांडी काल्याचे कीर्तन हरी भक्त पारायन विठ्ठलराव डाखरे महाराज वडगांव यानी आपल्या सुश्राव्य वाणीतून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले, बाल श्रीकृष्ण नी दही हांडी फोडली.याप्रसंगी बापूजी पा.पिंपलकर , प्राचार्य संजय ठावरी, प्रा. विनोद पंदाम , मंदिरा चे अध्यक्ष अरुण पा. नवले, सचिव शांताराम देरकर, दिनेश राठोड, मदन पा. नवले, तुलसीराम टेकाम, सुरेश गारघाटे, टीकाराम धुर्वे राजू नवले, टेकाम साहेब वनविभाग पारडी, देवीदास पा.गारघाटे, हिरालालभाऊ केसकर, पारखी महाराज , अनिल महाराज देरकर, पुंडलिक पा.गिरसावाले आणि सर्व सदस्य, उपस्थित होते. कीर्तनास परीसरातील महिला पुरूष व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृष्ण जन्माष्टमी महोत्सव निमित्त १२ मुलांनी वेशभूषा साकारली, त्यांस पारीतोषिके देण्यात आली. ठानेदार सदाशिव ढाकणे, डाखरे महाराज , डॉ.प्रमोद परचाके, प्रतीक बोरडे, विनोद कुमरे, गारघाटेजी,यांचा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यत आला, कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य संजय ठावरी नी केले शेवटी महाप्रसाद झाला त्याचा लाभ २००० भाविक भक्तांनी घेतला. मंदिर संस्थान चे अध्यक्ष अरुण पा.नवले यानी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवकानी मोलाचे योगदान दिले.