विधी चतुर्थ सेमिस्टर डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे मागणी
लोकदर्शन अमरावती प्रतिनिधी👉राजू कलाते
कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील उपस्थिती आणि शिक्षण पद्धती यावर प्रश्न उपस्थित करून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याची मागणी याआधी जोर धरून ठेवली होती. मात्र ती मागणी अमरावती विद्यापीठाने मान्य न करता पूर्वीप्रमाणेच परीक्षा घेण्याचा निर्णय ठामपणे परीक्षा घेतल्या. मात्र काही संभ्रम असणारी जीआर विद्यापीठाने काढल्याने आज ज्या विद्यार्थ्यांनी 80 गुणाचा पेपर सोडून त्यांना नापास व्हावे लागले. त्यामुळे 65 गुणाचा पेपर विद्यार्थ्यांनी सोडवा असा जीआर अमरावती विद्यापीठाने काढला होता. मात्र ज्या विद्यार्थ्यांनी जास्त गुणांचा पेपर लिहून सुद्धा त्यांनाच अपयशाला सामोरे जावे लागले. या संदर्भात आपला रोज व्यक्तीवरच दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी अन्याय ग्रस्त पीडित विद्यार्थी यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध न्याय मिळण्याकरिता विद्यार्थ्यांनी दाद मागण्याकरिता आपल्याच महाविद्यालय स्तरावर प्राथमिक निवेदन देऊन महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. मात्र प्राचार्यांनी पूर्णमूल्यांकन करिता विषय टाकण्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली. त्यावेळी मात्र विद्यार्थ्यांना आपल्याशा भंग होत असल्याचे चित्र त्याठिकाणी दिसून आले. त्यामुळे नाईलाजाने पीडित विद्यार्थ्यांनी थेट कुलगुरूंना गाठून आपली आपबिती सांगितली. तेव्हा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र कुलगुरू चौबे यांनी विद्यार्थ्यांशी सकारात्मक चर्चा करून सदर प्रकरण तात्काळ निवारणकरिता संबंधित विभाग तथा यंत्रणेला कामी लावण्याची शाश्वती निवेदन कर्त्या विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या निवेदनामध्ये कंबाईन पासिंग तथा योग्यरीत्या पुनर्मुल्यांकन करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. ज्यामुळे भविष्यातील होणारे विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भेटले व विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये येणारी पात्रतेची अडचण हे दूर होईल या अनुषंगाने निवेदन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना देण्यात आले.तर सदर निवेदनावर निष्काळजीपणे कारवाई केल्यास विद्यार्थी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.तर निवेदन देतेवेळी राजू कलाने, प्रशांत भराडे, सचिन आठवले, गौतम खोब्रागडे,ज्योती धांडे, निलेश आमले ,प्रतिक बोबडे ,प्रशांत भगत,अंकुश वानखडे, कमलाकर पाचपुते,
आदित्य ठाकूर,रुपाली मेश्राम उपस्थित होते.