लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे दिनांक 14 ऑगस्ट 2022 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वृक्षारोपण हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव तथा प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल मुसळे च्या हस्ते महाविद्यालयाचे मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आशिष पईनकर यांच्या हस्ते सुद्धा वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी सुद्धा वृक्षारोपण केले. अल्ट्राटेक फाउंडेशन यांच्या नर्सरी तर्फे वृक्षारोपण करिता रोपटे प्राप्त झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता रासेयो विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पुराणिक प्रा. सचिन करनेवार, डॉ. राजेश डोंगरे, सुशांत खिरटकर, प्रफुल्ल मुसळे, संतोष चौधरी , सविन मडावी, शालिक कांबळे , प्रशांत नवले, ननिता बुराण यांनी परिश्रम घेतले.,,
,,फोटो,,