लोकदर्शन👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदुर,च्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून विद्यालयाच्या वतीने राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनीत विद्यालयातील वर्ग ५ ते १० मधील शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या राख्या बनवून प्रदर्शनात भाग घेतला.राख्या तयार करताना तिरंगा,भारत माता, वंदे मातरम हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने राख्या तयार करण्यात आल्या .राख्या तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी रंगीत मणी, रंगीत माळा, लोकर, विविध प्रकारचे कागद, स्ट्रा ,कापूस इत्यादींचा वापर करून स्वतःची कल्पकता वापरून राख्या बनविल्या होत्या.
या राखी प्रदर्शनीचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी केले याप्रसंगी पर्यवेक्षक संजय गाडगे तसेच जेष्ठ शिक्षक महेंद्र कुमार ताकसांडे ,सुरेश पाटील, मरसकोल्हे , माधुरी उंमरे विशेष म्हणजे प्रदर्शन आयोजिका भुवनेश्वरी गोपमवार यांची उपस्थिती होती सदर प्रदर्शनी त्यांच्या कल्पकतेतून साकार झाली. राखी प्रदर्शनी पाहण्यासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी मुख्याध्यापक काळे यांनी विद्यार्थ्यांनी सहशालेय कार्यक्रमात सहभाग घेण्याचे तसेच प्रत्येक शिक्षकांनी आपल्या कल्पकतेनुसार वेगवेगळे उपक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.
,