लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 10 ऑगस्ट सोनारी गावातील सर्व महिला बचत गटाच्या सदस्यांची बैठक पंचायत समितीचे अधिकारी राम मदने यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंदिरात संपन्न झाली.यावेळी सर्व महिला बचत गटांच्या वतीने महासंघाच्या अध्यक्ष पदी सर्वानुमते बिनविरोधपणे सुजाता दिनेश कडू यांचे नाव सुचविण्यात आले असता पंचायत समितीचे अधिकारी राम मदने यांनी सुजाता दिनेश कडू यांचे नाव महासंघाचे अध्यक्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून वैशाली अनिल कडू, सचिव म्हणून अल्फा दिपक कडू, तर लिपिका म्हणून स्नेहा सागर म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर महिला सदस्यांनी आपल्या महिला बचत गटाच्या महासंघाला सर्वानुमते ‘सोनारीचा राजा महिला ग्रामसंघ’ असे नाव दिले. या सोनारीच्या राजा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष पदी सुजाता कडू यांची निवड केली.कार्यक्रमाला गावच्या सरपंच पूनम महेश कडू, ग्रामसेवक वि. आर.म्हात्रे, बँक सखी गौरी विजय कडू, तर सी आर पी किशोरी नरेश कडू व अंकिता तांडेल व सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.काही दिवसापूर्वीच सुजाता कडू यांची सोनारीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चेअरमन म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.आणि आता सोनारीचा राजा महिला ग्रामसंघाच्या अध्यक्ष पदी सुजाता दिनेश कडू यांची निवड झाल्याने सर्वांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी सुजाता कडू यांनी सर्वांचे आभार मानले.