लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा ची मोहीम संपुर्ण भारतात साजरी करण्यात येत आहे. या अंतर्गत गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे 5 ऑगस्ट 2022 रोजी ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत लोकांमध्ये तिरंगा ध्वज फडकवण्यासाठी जनजागृती व प्रवृत्त करण्यासाठी रॅली काढण्यात आली. या तिरंगा रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य रामकृष्ण पटले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. गडचांदूर शहरातील प्रमुख मार्गावरून प्रभातफेरी तिरंगा रॅली काढण्यात आली. नगर परिषद गडचांदूर च्या कार्यालयाला भेट देऊन रॅली चा समारोप करण्यात आला.राष्ट्रगीत घेण्यात आले. तेथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून रॅलीचे स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजना चे प्रमुख डा. संदीप घोडिले आणि महाविदयालयाच्या विद्यार्थी विकास विभागाचे डा. अजय कुमार शर्मा यांनी ही रॅली काढण्यासाठी पुढाकार घेतला. प्रा पवन चटारे, प्रा. चेतन वानखेडे,प्रा. मनोहर बांद्रे, डा. अनिस खान, डा. उत्कर्ष मून, प्रा. चेतन वैद्य व शिक्षकेत्तर वर्ग आणि विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी होते.रॅली मध्ये महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यासोबतच भारत माता की जय आणि वंदे मातरम चा नारा देत रॅलीत सहभागी सर्वांनी हातात तिरंगा घेऊन संपूर्ण शहरात भ्रमण केले.
,,