लोकदर्शन 👉किरण कांबळे
, भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने मा.प्रेमकुमार गेडाम साहेब यांच्या नेतृत्वा मध्ये महाराष्ट्र राज्यात शासनाद्वारे राबवण्यात येणा-या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि डीबीटी योजनेची रक्कम मागील १ ते १.५ वर्षांपासून शासनाकडून विद्यार्थ्यांना न दिल्यामुळे भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे आज 3 ऑगस्ट रोजी साताऱ्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी मा.रूपेश जयवंशी यांना निवेदन सुपुर्त केले.यावेळी उपस्थित पदाधिकारी मा.प्रथमेश ठोंबरे सर (राज्य उपाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश) मा.कुणाल देवकुळे सर (तालुका अध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) मा.रोहित नितनवरे सर (शहर अध्यक्ष,भारतीय विद्यार्थी मोर्चा सातारा) इ.पदाधिकारी निवेदन दिले.
तसेच माण तालुका व खटाव तालुक्यातुन मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.माण मधुन जिल्हा उपाध्यक्ष किशोर खरात व सुदर्शन खरात आणि 29 विद्यार्थ्यांचे सह्यांचे पत्र सुद्धा सोबत होते.आणि खटाव तालुक्यातुन माजी.जिल्हाध्यक्ष मा.मंगेश लोखंडे सर यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या शिष्ट मंडळाने वडुज ,खटाव तहसील कार्यालय निवेदन सादर केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही अनुसुचित जाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी 12 वी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाप्रमाणे निवास, निर्वाह भत्ता देण्यासाठीची आणि DBT योजना ही वसतिगृहाप्रमाणे भोजन ची व्यवस्था करण्यासाठी शासनाद्वारे विद्यार्थ्यांना भत्ता देण्याची शासन योजना आहे.
सर्व सामान्य विद्यार्थी जो दुर्बल घटकातील आहे, त्या साठी सदर योजना शिक्षण घेताना स्वतः च्या मुलभूत गरजा भागवण्याचे एक माध्यम आहे.या परिस्थितीत निधी अभावी.परंतु असे असताना देखील सरकार कडून या विद्यार्थ्यांना मागील एक ते दीड वर्षापासून योजनेची रक्कम मिळाली नाही.
या परिस्थितीत विद्यार्थ्यांना कर्ज काढून घरभाडे, शैक्षणिक साहित्य,खानावळ, पुस्तकांचा खर्च करावा लागत आहे.
पालकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे हा खर्च विद्यार्थ्यांच्याआवाक्या बाहेर जात आहे.
लॉकडाउनमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. तसेच पालकांवर येणारा ताण बघून विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चिकरण होऊन ते नैराश्या कडे वळत आहे.
अश्याच एका घटनेतून २०१८ मध्ये आपण योगेश पावरा सारखा अभ्यासू विद्यार्थी मानसिक तणावातून आत्महत्या केल्यामुळे गमवला आहे.
मागील सरकार च्या चुकीच्या धोरणांचा वारसा जर वर्तमान सरकार पुढे चालवत असेल तर राज्यात दुसरा योगेश पावरा घडू शकतो हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
असे घडू नये या साठी दिनांक १५ ऑगस्ट पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आणि DBT योजने ची थकबाकी सहित पूर्ण रक्कम सरकार व्दारे जमा केली जावी अशी मागणी भारतीय विद्यार्थी मोर्चा या निवेदना व्दारे करीत आहे.
जर १५ ऑगस्ट पर्यंत हि रक्कम विद्यार्थ्यांना मिळाली नाही तर १६ ऑगस्ट रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात सरकार विरोधात आंदोलन करण्यास बांधील असेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य शासनाची असेल याची नोंद घ्यावी.
या राज्यात भारतीय विद्यार्थी मोर्चा दुसरा कोणी योगेश पावरा होऊन देणार नाही.
शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्न आणि निवाऱ्यासाठी मजबूर करून त्यांची जेवणाची थाळी रिकामी ठेवणाऱ्या सरकार ला १६ ऑगस्ट रोजी भारतीय विद्यार्थी मोर्चा द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्यामधून ,जिल्ह्यातुन शेकडो-हजारो थाळ्या पोस्टातर्फे राज्य मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवल्या जातील.
किमान ती रिकामी थाळी पाहून ती थाळी भरण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी तात्काळ संबंधित विभागाला निधी सरकार देईल अशी आम्ही अशा करतो.
आम्हाला खात्री आहे की, तुम्ही विद्यार्थ्यांवर या आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही आणि विद्यार्थ्यांचा विचार करून सकारात्मक निर्णय द्याल.
आपण घेतलेला निर्णय bvmbymbbm1818@gmail.com या Email ID वर पत्राद्वारे कळवावा ही विनंती.
*आपला साथी*
*चेतन आवडे*
*(राज्य कोषाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश)*