लोकदर्शन👉 मोहन भारती
बल्लारपुर:-
कवी संजय लोहकरे यांनी महाराष्ट्राचे प्रसिद्ध कवी कमलेश जी पाटील वर्धा यांना आपले गुरू मानले आहे. कवी पाटील हे प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ, नागपूर या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत व कवी संजय लोहकरे हे त्याच संघाचे चंद्रपूर जिल्ह्याचे केंद्रीय सदस्य आहेत.
कवी संजय लोहकरे बल्लारपूर यांचे घरी हा गुरू शिष्य स्नेह मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. बुद्ध वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. सदर कार्यक्रमास बल्लारपूर तालुक्यातील कलावंतांना आमंत्रित केल्या गेले आणि या सर्व कलावंतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कवी कमलेश पाटील यांनी सुत्र बंधन करून कवी संजय लोहकरे यांना आजपासून आपले शिष्य झाल्याचे व आजन्म त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
या नंतर कवी कमलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघ, नागपूर या संघाची बल्लारपूर तालुका कार्यकारिणी तयार करण्यात आली ज्यामध्ये शत्रूघ्न खाडे हे अध्यक्ष, शिवदास थूल उपाध्यक्ष, ईश्वर पाटील सचिव, सरिता वेले व गुणवंत सिडाम सहसचिव तसेच संतोष निरांजने यांना कोषाध्यक्ष बनविण्यात आले. मुख्य सल्लागार म्हणून संजय लोहकरे, शंकर वनकर, भाऊराव लोखंडे व कमल धुरंदर यांची निवड करण्यात आली. उदघोषक म्हणून विशाल डुंबेरे, फोटोग्राफर अशोक नाईक तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून सिद्धार्थ गोसावी यांची नियुक्ती करण्यात आली.
या नंतर स्थानिक कलावंतांनी बुद्ध भीम गीते सादर केली व या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.