लोकदर्शन👉 मोहन भारती
गोंडपिपरी :– स्वातंत्र्याचा अमृत महोसव अंतर्गत महा आवस अभियान सत्र २०२१-२२ अंतर्गत गोंडपिपरी तालुक्यातील घरकुल पुरस्कारांचे वितरण लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृह, गोंडपिपरी येथे आयोजित करण्यात आला. तसेच केंद्र शासनाच्या घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत घरकुल योजना यामध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना अंतर्गत आज तालुक्यातील सर्वात्कृष्ट घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार आमदार धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
या पुरस्कारांमध्ये तालुकास्तरीय सर्वात्कृष्ट क्लस्टर प्रथम पुरस्कार अविनाश मेश्राम भं. तळोधी – विठ्ठलवाडा क्षेत्र, द्वितीय पुरस्कार प्रतीक पोगुलवार धाबा – तोहोगाव क्षेत्र, तृतीय पुरस्कार समर्य उराडे आक्सापूर वढोली क्षेत्र, सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत प्रधानमंत्री आवास योजना प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत वडकुली, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत खराळपेठ, तृतीय पुरस्कार ग्रामपंचायत चेक दरूर, राज्य पुरस्कृत आवास योजना सर्वात्कृष्ट ग्रामपंचायत प्रथम सकमुर, द्वितीय बोरगांव, तृतीय तारडा. ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार, प्रधानमंत्री आवास योजना प्रथम पुरस्कार रमेश वाघाडे ग्राम पं. वाडकुली चंद्रदास सुरकर ग्राम पं. वाडकुली फुलैय्या राजकोंडावार भं.तळोधी, ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार, राज्य पुरस्कृत आवास योजना प्रथम पुरस्कार योगेश्वर बनकर ग्राम पंचायत वडकुली, द्वितीय पुरस्कार विकास आत्राम ग्राम पंचायत चेक पारगाव, तृतीय पुरस्कार गिरीश तेलसे ग्राम पंचायत तरडा असे विविध पुरस्कार वितरण करण्यात आले.
या प्रसंगी तहसीलदार के. डी. मेश्राम, गट विकास अधिकारी गजानन मुंडकर, शहर अध्यक्ष देवेंद्र बट्टे, सरपांच अर्पण रेचानकर, सालेझरी चे राजू राऊत, वाडकुली चे रंजू खरबकर, गावातील सरपंच, ग्राम सेवक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश रामटेके यांनी केले तर आभार वासुदेव लाटघरे यांनी मानले.