लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 2 जुलै रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोदिवळे, नेरळ येथील रहिवाशी आशा अनंत राणे या महिलेने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच दलित हरिजन आणि बौद्ध समाजा बददल जातीवाचक, अपमानकारक आक्षेपार्ट पोस्ट फेसबूकवर, सोशल मिडियावर टाकली होती.या पोस्ट मुळे समाजात तेढ निर्माण झाले होते.या महिले विरोधात संपूर्ण रायगड जिल्ह्यात संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आशा अनंत राणे या महिलेने केलेल्या अत्यंत चूकीच्या, आक्षेपार्ह पोस्टचा निषेध करण्यासाठी व आशा राणे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बौद्धजन पंचायत समिती उरण बौद्धवाडा शाखा 843 तर्फे उरण पोलिस स्टेशन येथे उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुहास चव्हाण यांना निवेदन देऊन करण्यात आली.
भारतीय संविधानाचा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बौध्द समाजाचा आशा राणे या महिलेने सोशल मिडियाच्या माध्यमातून अपमान केल्याने तिच्यावर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम अंतर्गत अट्रासिटीचा गुन्हा व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बौद्धजन पंचायत समिती उरण बौध्दवाडा शाखा क्रं.843 चे अध्यक्ष प्रकाश धर्मा कांबळे, उपाध्यक्ष हरेश दामोदर जाधव, खजिनदार अनंत बुध्दाजी जाधव, बौध्दचार्य महेंद्र रघुनाथ साळवी,विनोद सदाशिव कांबळे, आखिलेश रामचंद्र जाधव, हर्षद किशोर कांबळे, जितेंद्र वसंत भोरे, साहिल संतोष जोशी, प्रशांत प्रकाश कांबळे, सिध्दार्थ देविदास सपकाळे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.