लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापीका तथा प्राचार्या सौ स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे, पर्यवेक्षक एच बी मस्की,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे,होते.
सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,
श्वेतलाना टिपले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्य ची सविस्तर माहिती दिली, प्राचार्या स्मिताताई चिताडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विचार विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याने ते आत्मसात करणे आवश्यक आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा आरजू आगलावे यांनी केले तर आभार मनोज तोडासे यांनी मानले. याप्रसंगी दिनविशेष समिती च्या प्रमुख प्रा नंदाताई भोयर,व सर्व सदस्य, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.,,